रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल, दर पडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात
रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल, दर पडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात Saam Tv
महाराष्ट्र

रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल, दर पडल्याने उत्पादक शेतकरी संकटात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे Dada Bhuse यांच्या नशिक Nashik जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या मतदार संघामधील येवल्यात Yeola टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल बघायला मिळत आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आवक अधिक येत असल्यामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोला Tomatoes मातीमोल भाव मिळाला आहे.

कमी भाव मिळाल्याने संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकल्यामुळे येवला- नगर Nagar राज्य मार्गावर टोमॅटोचा लाल चिखल बघायला मिळाला आहे. दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत चालल्याने शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव २० ते ३० रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास १ ते दीड रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळत आहे.

हे देखील पहा-

या परिस्थितीने उत्पादन खर्च तर दूरच तोडणी आणि वाहतूक खर्च देखील अर्धा मिळणार नसल्यामुळे संतप्त होत या शेतकऱ्यांने येवला- नगर राज्य मार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली याठिकाणी टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे. वाहनांच्या खाली टोमॅटो दबल्यामुळे रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

नाशिक, नगर, पुणे आणि औरंगाबाद Aurangabad बरोबरच राज्यामधील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. या कारणाने टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्यामुळे आणि मागील ३ वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्यामुळे त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या भावावर होताना दिसून येत आहे.

लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार पेठेत टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला ६० ते १०० रुपयांपर्यंत म्हणजे ३ ते ५ रुपये किलो इतका बाजार भाव मिळत आहे. कमी भावामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत वाहतूक, मार्केटमधील चढ- उतर, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नसल्याने, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT