Tomato Rate Decreased: राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. अशात टोमॅटोचे भावही गगनाला भिडलेत. अनेक नागरिकांनी आपल्या रोजच्या जेवणात टोमॅटो खाणे देखील सोडून दिलेय. टोमॅटोच्या दरांनी उच्चांकी गाठल्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता एक दिलासादायक बामती समोर आली आहे. पुण्यातील बाजारात टोमॅटोचे दर निम्म्याहून खाली घसरले आहेत. (Latest Marathi News)
पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत. अचानक टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे 50 टक्के घट झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो 50 ते 85 रुपये प्रतिकिलो बाजरभावाने विकला जात आहे.
कालपर्यंत २० किलोच्या क्रेटला दोन ते अडीच हजाराच्या दरम्यानचा भाव होता. आज सकाळपासून मात्र हाच भाव 1000 ते 1700 रुपयांच्या दरम्यान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये थोडा नाराजीचा सूर आहे. मात्र मागच्या दोन दिवसात 2 ते अडीच हजार रुपये दराने खरेदी केलेला टोमॅटो व्यापाऱ्यांनी आज राज्यातील विविध बाजारपेठमध्ये विक्रिला पाठवला आहे तेथे निम्म्याने दर कमी झाल्याने हा सगळा तोटा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
फक्त पुण्यातील नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईसह अन्य ठिकाणी देखील टोमॅटोच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पावसामुळे येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. महागाईने सर्वसान्य नागरिक पिळवटून निघालेत. डाळींपासून खाद्य तेलाच्या किंमतींचाही भडका उडालाय. त्यामुळे पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.