wardha news.  saam tv
महाराष्ट्र

Wardha News : कॅन्टीन कर्मचा-याचा प्रामाणिकपणा, साेन्याच्या दागिन्यांची पर्स केली परत

तात्काळ नागपूरला पोहोचण्यासाठी निघालेले कुटुंब कॅन्टीनमध्येच पर्स विसरले हाेते.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : वर्धेच्या कारंजा घाडगे येथील टोलनाका जवळील कँटीनमध्ये विसरलेली दागिन्यांची पर्स सुरक्षित एका कुटुंबास परत मिळाली. टोल नाका कॅन्टीनवरील कामगाराने ही पर्स सुरक्षित ठेवली होती. कामगाराने पोलिसांना पर्स दिल्यानंतर संबंधितास ऐवजासह पर्स परत करण्यात आली. (Maharashtra News)

अमरावती येथून नागपूर येथे घरी जात असताना नागपूर येथील चंद्रकांत आत्राम व त्यांचा परिवार कारंजा टोल नाक्यावर कॅन्टीनमध्ये चहापाणी घेण्याकरिता थांबले. त्यांच्या आईची प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ नागपूर येथे पोहोचण्यासाठी निघाले.

दरम्यान घाईने जाताना त्यांची पत्नी शितल आत्राम यांच्याजवळ सोन्याचा ऐवज असलेली पर्स त्या कँटीनवरच विसरल्या. या कॅन्टीनमध्ये काम करणा-या मनोज साहेबराव नाईक याला ही पर्स दिसली. त्याने पर्स बाबतची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर आत्राम कुटुंबियांना त्यांची पर्स पाेलिसांनी सर्व ऐवजसह सुरक्षित परत केली. यावेळी पाेलिसांनी आणि आत्राम कुटुंबियांनी दागिन्यांना आकर्षित न हाेता मनाेज नाईक यांनी पर्स परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे काैतुक केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT