Weather Updates  Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : या १२ जिल्ह्यात किरकोळ पावसाचा अंदाज, २४ जिल्ह्यात पावसाची विश्रांती, वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain Update : आज राज्यात किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे.

Namdeo Kumbhar

Weather Update In Marathi : भाऊबीजेला राज्यात मिश्र वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १२ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर २४ जिल्ह्यात स्वच्छ, कोरडे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी पावसाची रिपरिप काही ठिकाणी सुरुच आहे, त्यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात वातावरणात गारवा वाढलाय. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे.

आज कसं असेल वातावरण?

राज्यात आज मिश्र वातावरण राहील, असा अंदाज वर्तवलाय. मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज आभाळ कोरडे राहण्याची शक्यत आहे. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवलाय.राज्यातील उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल, असे हवामान विभागाने सांगितलेय.

ऑक्टोबर हिटपासून दिलासा कधी ?

नोव्हेंबर महिना सुरु झाला, पण उकाडा काही गेला नाही. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त आहेत. पण राज्यात लवकरच थंडीची चाहूल लागू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणात गारवा आला आहे. मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील कमाल तापमानातही घट झाली आहे. ४ नोव्हेंबरपासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमीच असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daryabhawani: दिग्पाल लांजेकरांच्या 'दर्याभवानी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित; रंगणार शिवरायांच्या सागरी पराक्रमाची गाथा

Maharashtra News Live Update: माणगाव येथील मुंबई गोवा महामार्गावरील नवीन पुलाला केवळ दहा दिवसांत पडले खड्डे

Bird Behavior: पक्षी घरट्यात सिगारेचे थोटके का ठेवतात? हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! माहीम रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशाला चाकूने भोसकलं; धक्कादायक कारण समोर

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT