Rain Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज, उद्यापासून तीन दिवस पावसाची शक्यता Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Rain News : राज्यात आजपासून पावसाची शक्यता; पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही बरसणार!

Maharashtra Weather News : दिवाळीमध्ये राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय.

Namdeo Kumbhar

Today's Weather Update in Marathi : राज्यात परतीच्या पावसाने पूर्णपणे माघार घेतली आहे. पण बंगालच्या उपसागरात उदर्तायुक्त पूर्वीय वारे वाहत असल्यामुळे पावसासाठी वातावरण अनुकूल झालेय. त्यामुळे राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ऐन दिवाळीत राज्यात पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. पण पावसाचे प्रमाण तुरळक ते मध्यम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याशिवाय कोकणात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात रिमझिम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. काही ठिकाणी हुडहुडीही भरण्यास सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला असला तरी पहाटे मात्र हवेत गारवा आहे. त्याशिवाय दव आणि धुक्याची चादर पडत असल्याचे चित्र आहे. गुलाबी थंडीच्या वातावरणात राज्यात तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आज (२९ ऑक्टोबर) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

कोण कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज ?

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नाशिकसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके अशेल. नागपूरमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात महाबळेश्वरमध्ये सर्वात निचांकी तापमान नोंद होण्याची शक्यता आहे. सोमवारी महाबळेश्वरमध्ये तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन; वाढत्या प्रदूषणास कारणीभूत व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी आंदोलन

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT