Top 10 Marathi News Headlines top 10 headlines
महाराष्ट्र

Top 10 Headlines : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह, मुंबई-पुण्यात भाविकांची गर्दी; वाचा टॉप १० हेडलाइन्स

Satish Daud

राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह

आजपासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून अतिशय मंगलमय वातावरणात भाविकांकडून लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केलं जातंय. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावरून भाविक घरी आणत आहेत.

पुण्यात कसबा गणपतीची मिरवणूक

पुण्यातील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली आहे. ढोल ताशांच्या गजरात भाविक बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. यावेळी कसबा पेठेत भक्तीमय वातावरण निर्माण झालंय.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या मुंबईतील शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी बाप्पाच्या दर्शनाला येणार आहेत.

दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

पुण्यातील प्रसिद्ध दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पुणे शहरासह राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक भाविक दगडुशेठ मंदिरात दर्शनासाठी आले आहेत. यावेळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

उत्सवांचे माहेरघर असलेल्या लालबाग-परळ भागात गणेशभक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. भाविकांसाठी चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा दोन रांगाद्वारे दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचे आगमन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. ठाकरे कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात बाप्पाचं स्वागत केलं असून आरती देखील केली आहे. यावेळी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बाप्पाला साकडे

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना देखील बाप्पाच्या आगमनाची ओढ लागली आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बाप्पाला साकडं घातलं आहे. "पालक विश्वाचा बाप्पा माझा, आशीर्वाद माझ्यावरी, विद्यादाता, विघ्नहर्ता, दया सागराची कृपादृष्टी सर्वांवरी, मी केवळ एक माध्यम, देणारा तोचि लंबोदर, विनायक", अशी पोस्ट अजितदादांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरात गणपती उत्सवाला सुरुवात

छत्रपती संभाजीनगरातही आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजता ग्रामदैवत संस्थान गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, अतुल सावे, संदीपान भुमरे, कल्याण काळे, संजय शिरसाठ यांची उपस्थिती होती.

महसूलमंत्री विखे पाटलांच्या हस्ते गणरायाची स्थापना

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाच विधिवत पूजन करत स्थापना केली. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना गणेश स्थापनेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी निवासस्थानी गणेश पूजा न करता कारखाना कार्यस्थळावरच विखे परिवार गणेशाची स्थापना करतात.

सोनाली कुलकर्णीने स्वत:च्या हाताने घडवली बाप्पाची मूर्ती

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. सोनालीने आपल्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवली असून फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'आमचे बाप्पा विराजमान झाले' असे कॅप्शन अभिनेत्रीने दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT