Weather Update News Saam tv
महाराष्ट्र

Today Weather : महाराष्ट्र गारठला! परभणीत पारा ५.५ अंशावर, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, आज कसं राहिलं हवामान?

Maharashtra Weather Update News : उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, परभणीमध्ये तापमान ५.५° पर्यंत घसरले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी.

Alisha Khedekar

  • राज्यच्या तापमानात मोठी घट

  • थंडीचा कडाका वाढला.

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाचा यलो अलर्ट

  • परभणीमध्ये ५.५° तापमानासह तीव्र थंडीची नोंद

उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली असून, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे.

आज मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात आणि विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. राज्यात पुढील ४८ तासात किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होणार असून त्यानंतर २ ते ३ अंश सेल्सिअसने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

परभणीचा पारा घसरला

परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परभणीचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. सध्या परभणीचे तापमान ५.५ अंशांवर नोंदवले गेले आहे, आणि त्यामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ही शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. येवढ्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतात ऊस ,हरबरा, ज्वारी , या पिकांना रात्रीची लाईट असल्याने पाणी देत आहे, तर परभणीचे तापमान अतिशय कमी झाले असल्याने शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे.

राज्यातील पुढील जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला

  • अहिल्यानगर: ६.६ अंश सेल्सिअस

  • पुणे: ७.९ अंश सेल्सिअस

  • जळगाव: ७.० अंश सेल्सिअस

  • कोल्हापूर: १४.४ अंश सेल्सिअस

  • महाबळेश्वर: ११.१ अंश सेल्सिअस

  • मालेगाव: ८.८ अंश सेल्सिअस

  • नाशिक: ८.२ अंश सेल्सिअस

  • सांगली: १२.३ अंश सेल्सिअस

  • सातारा: १०.० अंश सेल्सिअस

  • सोलापूर: १३.२ अंश सेल्सिअस

  • छत्रपती संभाजीनगर: १०.८ अंश सेल्सिअस

  • परभणी: ५.५ अंश सेल्सिअस

  • अकोला: १०.० अंश सेल्सिअस

  • अमरावती: १०.२ अंश सेल्सिअस

  • बुलढाणा: १२.२ अंश सेल्सिअस

  • गोंदिया: ८.० अंश सेल्सिअस

  • नागपूर: ८.१ अंश सेल्सिअस

  • वर्धा: ९.९ अंश सेल्सिअस

  • यवतमाळ: १० अंश सेल्सिअस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gobi Paratha Recipe : 'असा' बनवा झणझणीत कोबीचा पराठा, लहान मुलं मिनिटांत टिफिन फस्त करतील

Solapur : सोलापूर पुन्हा हादरलं; राजकीय वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या

Maharashtra Live News Update: परभणी शहर महानगरपालिकेच्या 16 प्रभागातील 65 जगासाठी 411 उमेदवार रिंगणात

Copper Side Effects: तांब्याची भांडी या ४ रुग्णांसाठी धोक्याची, जाणून घ्या महत्वाची माहिती

MPSC आंदोलनाला मनोज जरांगेंची साथ; PSI वयोमर्यादेवर सरकारविरोधात संताप|VIDEO

SCROLL FOR NEXT