Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Weather Alert : शेकोटी पेटल्या! राज्यात तापमानाचा पारा घसला; 'या' जिल्ह्यांत गुलाबी थंडी, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. नागपूर, संभाजीनगर, नंदुरबार, जळगावात तापमानात घट. धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद. पुढील दोन दिवस थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता.

Alisha Khedekar

  • राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र होण्याची शक्यता

  • नागपूर, संभाजीनगर, जळगावात तापमान घटून गारवा वाढला

  • धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद

  • पुढील दोन दिवस धुके वाढून दृश्यमानता घटण्याचा अंदाज

राज्यात तापमानाचा पारा वाढला असून थंडीची लाट ओसरली आहे. मात्र काही ठिकाणी गारठा कायम आहे. पहाटे गारठा कायम असला तरी, आकाश निरभ्र होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होत पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नागपूर, संभाजीनगर, नंदुरबार,जळगाव या जिल्ह्यांमध्ये थंडीचा गारठा वाढला आहे.

महाराष्ट्रात गारठा कायम असला तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. पहाटे धुकं पसरलं असून, हवेत थंडी जाणवत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पारा १० अंशांच्या पुढे गेल्याने गारठा कमी झाला आहे. आज राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम राहून, थंडी कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

संभाजी नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. मागच्या आठवड्यात थंडी कमी होती मात्र या आठवड्यात थंडी वाढलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी जगोजागी शेकोट्या वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आठवड्यापासून थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे आता नागरिक उबदार कपड्यांचा आणि शेकोट्यांचा आधार घेत आहे.

नागपूर शहरात पारा १०.८ अंशावर

पश्चिम उपसागरातील चक्रीवादळ कमजोर पडू लागल्याने व उत्तरेकडील मैदानातील भागांकडे वारे वाहू लागल्याने विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. नागपूर शहरात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. शहराचा पारा १०.८ अंशावर गेला आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने हवेत गारवा वाढला आहे. पुढील आठवड्यात शहरात थंडीची लाट कायम असण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

जळगाव शहरात तापमान १२.६ अंशावर

जळगाव शहरात डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला शीतलहरीप्रमाणे -स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासनू किमान तापमान १२.६ अंशावर स्थिरावले आहे. तर कमाल तापमानात एक अंशाने घट होऊन शुक्रवारी शहरातील पारा २७.८ अंशावर आला होता. पुढील २ दिवसात थंडीची लाट जोर धरण्याची शक्यता आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत घसरू शकते. या काळात कमाल तापमान २६ अंशांपर्यंत राहील. रेडिएटिव्ह फॉग व उत्तर भारतातील थंड हवेच्या प्रवाहामुळे थंडी तीव्र होईल. सकाळी धुके वाढून दृश्यमानता ४०० मीटरांपर्यंत खाली येऊ शकते असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी वर्तवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुतीची घोषणा होताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट

मोठी बातमी! पुण्यानंतर आणखी एक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर, कारण काय?

Bus Accident: वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; दोन-तीन जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अखेर ठरलं! ZPत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, निवडणुकीसाठी रणनीती ठरली

SCROLL FOR NEXT