Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

अचलपूरमध्ये संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी साडेतीन तास सूट

रविवारी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे जातीय दंगल झाल्यानंतर अचलपूर, परतवाडा, कांडली व देवमाळी या ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - रविवारी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे जातीय दंगल झाल्यानंतर अचलपूर, परतवाडा, कांडली व देवमाळी या ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे. आज या संचारबंदीचा तिसरा दिवस असून संचारबंदीमुळे (Curfew) जनजीवन विस्कळीत झाले असून अर्थचक्र थांबलं आहे. तर काल पासून वेगवेगळ्या वेळात संचारबंदीत शिथिलता देण्यात आली होती. मात्र आज सकाळी ६ ते ९.३० वाजेपर्यंत संचारबंदीपासून शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे देखील पाहा -

या साडेतीन तासात नागरिकांना खरेदीसाठी बाहेर येता येणार आहे. मात्र नंतर पुर्णवेळ तिथं संचारबंदी कायम असणार आहे. दोन दिवसांनी सकाळी रस्त्यावर रेलचेल दिसून आली तर नागरिकांकडून काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले. तर लवकरच जनजीवन सुरळीत व्हावं अशी अपेक्षा करण्यात येत आहे. तर दुपार नंतर परिस्थिती पाहून संचारबंदी उठवण्याची शक्यता आहे. मात्र रात्रीची संचारबंदी कायम असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

Numerology: या तारखेला जन्मलेली व्यक्ती असते श्रीमंत, राजसारखे आयुष्य जगते

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

SCROLL FOR NEXT