Satara News Saam Tv
महाराष्ट्र

शिवसेनेतील अंतर्गत कलह मिटावा म्हणून सांगली शहर प्रमुखांचे भवानी मातेला साकडे...

किल्ले प्रतापगडावर लोटांगण घालत घातले आई भवानी मातेला साकडे...

ओंकार कदम

सातारा - राज्यात शिवसेना (Shivsena) पक्षात उभी फूट पडली असून शिवसेना पक्षाचे ४२ आमदारांनी राज्य सरकार विरोधात बंड पुकारत आधी सुरत आणि आता गुवाहटी येथे आहेत. हे सरकार बरखास्त करा आणि भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन करा अशी मागणी करण्यात येत आहे.

मात्र मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) मात्र या गोष्टी मान्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे सध्या शिवसेना पक्षातच अंतर्गत वाद निर्माण झाला असून बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला असतानाच बंडखोर आमदार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहेत.

हे देखील पाहा -

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनाकडून समर्थानासाठी देखिल आंदोलन सुरू आहेत. त्यामळे राज्यातला शिवसैनिक मात्र पेचात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सांगली शिवसेना शहरप्रमुख मयूर घोडके, उपशहरप्रमुख राम काळे, विभाग प्रमुख कैलास वडर विभागप्रमुख दिनेश शेलार, विभागप्रमुख अमोल कांबळे, शाखाप्रमुख अभिजीत कळसेकर उपशाखाप्रमुख रोहन रनभिसे इत्यादी पदाधिकार्यांनी समन्वयाची भूमिका घेत सांगली वरून शिवरायांचा ऐतिहासिक प्रतापगड गाठला आणि प्रतापगडाच्या पायथ्यापासून आई भवानी मातेच्या मंदिर ते छत्रपतींच्या आश्वरूड पुतळ्या पर्यंत लोटांग घालत आई भवानी मातेला साकडे घातले.

सध्या राज्यावर आलेले संकट दूर कर आणि रक्ताचे पाणी करत बाळासाहेब ठाकरे यांनी व शिवसैनिकांनी उभारलेल्या शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटव आणि पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकत्र यावेत या साठी यासाठी शिवसैनिकांनी तुळजा भवानीच्या मंदिरात अनवाणी पायांनी लोटांग घालत साकडे घातले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT