कल्याण : टिटवाळा स्थानकावरून पहाटेच्या लोकलने लग्नाला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याची ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिन्याची पर्स चोरल्याची घटना घडली होती. या घटनेने टिटवाळा (Titwala) परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चोरट्याला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चोरट्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केले आहेत. राजेश बबन घोडविंदे असे आरोपीचे नाव आहे. (Titwala latest Crime News)
हे देखील पाहा -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यात राहणारे ७४ वर्षीय भगवत डावरे आणि त्यांची पत्नी सत्यभामा (६९) हे दोघे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी टिटवाळ्यातून नाशिकला निघाले होते. सकाळी ६ वाजताच्या लोकलची टिटवाळा स्थानकातील फलाट क्रमांक १ वर प्रतीक्षा करत थांबले होते. त्यादरम्यान थांबलेल्या डावरे यांनी आपल्या बॅग एका कठड्यावर ठेवल्या. या संधीचा फायदा घेत चोरटा राजेश बबन घोडविंदे याने त्यांची दागिने असलेली पर्स चोरून (Theft) पळ काढला. त्यामुळे टिटवाळा स्थानकावरील प्रवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेनंतर डावरे यांनी पोलीस स्ठानक गाठले. त्यानंतर डावरे यांच्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या दिवसाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. मात्र, चोरटा सीसीटीव्हीत दिसत नसल्याने त्याला पकडण्याचे आव्हान होते. अखेर गुप्त बातमीदाराच्या मदतीने इतर सीसीटीव्हीत दिसणाऱ्या आरोपीचा माग काढला. त्यात पोलिसांना यश मिळाले. तब्बल १८ दिवसानंतर पोलिसांनी वाशिंद रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेला ३ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या रेल्वे पोलिसांनी दिली.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.