Sangli Crime
Sangli Crime विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli: 'पैसे दिले नाही तर...'; सावकाराच्या धमक्यांना घाबरुन सलून व्यावसायिकाची आत्महत्या

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : खासगी सावकाराच्या तगाद्याला आणि जाचाला कंटाळून एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या (Salon Businessman) केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील (Sangli District) कडेगाव तालुक्यात घडली आहे. कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दमधील मनोज सीताराम शिंदे (वय ४०) असे या सलून व्यावसायिकाचे नाव आहे.

त्याने सलून व्यवसायासाठी व्याजाने पैसे (Money) घेतले होते. याच पैशातून खासगी सावकाराच्या तगाद्याला व जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी ३१ जुलैरोजी पहाटे पाच वाजता हिंगणगाव खुर्द येथे घडली.

याप्रकरणी संशयित आरोपी, खासगी सावकार प्रदीप किसन यादव (वय ३३, रा. कडेपूर, ता. कडेगाव) याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

पाहा व्हिडीओ -

प्रदीप यादव याने जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत मनोज शिंदे यांना सलून व्यवसायासाठी ३० हजार रुपये व्याजाने दिले होते. त्या पैशाचे व्याजापोटी मनोज शिंदे यांनी ९० हजार रुपये परत दिले होते. तरीही प्रदीप यादव याने मनोज शिंदे व त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

तसंच प्रदीप याने 'तू माझे कसलेही पैसे दिले नाहीस, तु पैसे दिले नाहीस, तर मी तुला सुखाने जगू देणार नाही', अशी धमकी दिली. प्रदीप यादव हा वारंवार शिंदे यांना शिवीगाळ करून धमकी देऊन मानसिक त्रास देत होता.

या मानसिक त्रासातून मनोज यांनी ३१ जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घराच्या बाजूच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत वैशाली शिंदे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT