Palghar News: डहाणूत जबरदस्तीने धर्मांतरणाचा डाव उधळला; पोलिसांनी चार मिशनरींना केली अटक

Palghar Conversion Crime News: आदिवासी वृद्ध महिलेचे धर्मांतरण करुन तिला ख्रिश्चन (Christianity) धर्मात घेण्याचा या आरोपींचा डाव गावकऱ्यांनी हाणून पाडला आहे.
Palghar Conversion Crime News
Palghar Conversion Crime NewsSaam TV
Published On

पालघर: एकीकडे आपला देश अमृतमोहत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, तर दुसरीकजे अजूनही आपल्या देशाती जाती-धर्मावरुन वाद सुरू आहेत. धर्मांतरण हा मुद्दाही देशातल्या अनेक भागात गाजतोय. पालघर (Palghar) जिल्हातील डहाणू तालुक्यात जबरजस्तीने धर्मांतरण (Conversion) करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तथाकथित मिशनऱ्यांचा डाव फसला आहे. एका आदिवासी वृद्ध महिलेचे धर्मांतरण करुन तिला ख्रिश्चन (Christianity) धर्मात घेण्याचा या आरोपींचा डाव गावकऱ्यांनी हाणून पाडला आहे. (Dahanu Conversion Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्यासाठी अनेकदा या तथाकथित मिशनऱ्यांकडून प्रयत्न होत असतात. यासाठी त्यांच्याकडून धर्मांतरण करणाऱ्या व्यक्तील पैसेही दिले जातात. आमचा ख्रिश्चन धर्म स्विकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा या मिशनऱ्याचा डाव होता, जो डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला आहे. डहाणूजवळील सरावली तलावपाडा येथे काल दुपारी घरात एकटी असलेल्या वयस्कर आदिवासी महिलेला पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या चार मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासीबहुल तालुक्यात धर्मांतरणाची समस्या खूप जूनी आहे. ख्रिश्चन धर्म स्विकारण्याची सक्ती केल्याची तक्रार या महीलेने डहाणू पोलिसांत केल्याने महिलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी. बैला, मरीयामा टी. फिलीप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा या चार मिशनरींना ताब्यात घेऊन भा.दं.वि. कलम १५३,२९५,४४८,३४ प्रमाणे गुन्हे दाखल करुन अटक केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com