- रणजीत माजगावकर
Kolhapur News : काही जणांनी समाज माध्यमात विशेषत: व्हाॅट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी चार दिवसांपुर्वी बंदचे आवाहन केले हाेते. त्यावेळी झालेल्या आंदाेलनास हिंसक वळण लागले. त्याचे पडसाद काेल्हापूर (kolhapur bandh) शहरात उमटले. दरम्यान कागल (Kagal Bandh) येथे टिपू सुलतान (tipu sultan status) याचे स्टेटस ठेवल्याने आज (साेमवार) कागल बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News)
रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल परिसरात एका व्यक्तीने टिपू सुलतान याचे व्हाॅट्सअप स्टेटस ठेवल्याने कागल शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे अनेक लोक जमा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कागल पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कारवाई केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आज (साेमवार) कागल बंदची हाक दिली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कागल बंदीची हाक मागे घ्यावी असा आवाहन केलेलं आहे. दरम्यान आज कागल शहरात पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त आहे.
शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. रस्त्यांवर नागरिकांची तुरळक गर्दी आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांचा चाैका चाैकात बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.