तुळजा भवानी माता, तुळजापूर. 
महाराष्ट्र

तुळजाभवानी माता मंदिरालगतची तीन मंदिरे सील!

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

कैलास चौधरी

उस्मानाबाद ः कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. सरकारलाही ही संभाव्य लाट सतावते आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाला अलर्ट केले आहे. बहुतांशी भागात ढिल दिली असली तरी अद्यापि मंदिरे खुली झालेली नाहीत. पंढरीची वारीही कडक निर्बंधात गेली. सरकारने इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

शाळा सुरू करण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. मग मंदिरांबाबतच का दुजाभावा, असा सवाल भाविकांकडून केला जात आहे. विरोधी भाजपनेही त्यासाठी रान उठवलेले आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरालगत असलेल्या तीन उपदेवतांची मंदिरे सील करण्यात आली आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करीत गर्दी केल्याने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी मंदिरे सील केली.Three temples in Tuljapur were sealed

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या मंदिराची पाहणी केल्यानंतर गर्दी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तुळजाभवानी मंदिर बंद आहे. त्यामुळे अनेक भाविक तुळजाभवानी देवीच्या महाद्वाराचे व मंदिर कळसाचे दर्शन बाहेरून जातात. मात्र, तुळजाभवानी मंदिर परिसर शेजारील उपदेवी देवतांची मंदिरे आहेत. अन्नपूर्णा देवी, टोळ भैरव व मातंगी देवी मंदिर या ठिकाणी भाविक येऊन मोठी गर्दी करतात.

वारंवार तोंडी सूचना देऊनही इथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व उपाययोजनाची पायमल्ली होत असते. या कारणाने तहसीलदार तांदळे यांनी तीन मंदिरे सील केली आहेत. तुळजा भवानीच्या उपदेवतांची मंदिरे सील केली असली तरी देवीदेवतांच्या दैनंदिन धार्मिक विधी करण्यासाठी प्रशासन एक रजिस्टर ठेवणार आहे. Three temples in Tuljapur were sealed

ज्यात कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी मंदिरात येताना जाताना पुजारी यांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही धार्मिक भावना दुखावली जाणार नाही, पुजाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, कमाल आहे व्हॉट्सअ‍ॅपचं डायलिंग फीचर

Kidney Failure Symptoms: किडनी फेल्युअरची 'ही' लक्षणं लघवीद्वारे दिसतात, वेळीच लक्ष द्या

Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?

Hair Care : केस मोकळे ठेवून झोपावं की बांधून? वाचा फायदे-तोटे

Electric Shock : वेल्डिंग काम करताना घडले दुर्दैवी; विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT