Samruddhi Mahamarg Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; एअरबॅग उघडून फाटल्या, तिघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर दौलताबादजवळ कारचा भीषण अपघात झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही.

Satish Daud

रामू ढाकणे, साम टीव्ही संभाजीनगर

Samruddhi Mahamarg Accident

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राहुल आनंद निकम (वय ४७), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१) अशी मृतांची नावं आहेत. मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होते. शनिवारी (१० फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची कार दौलताबाद परिसरात आली. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून जात असलेल्या अज्ञात वाहनांना धडकली. (Latest Marathi News)

हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातावेळी कारच्या एअरबँग उघडल्या. पण कुणाचाही जीव वाचला नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले आहेत.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही महिन्यांपासून खंडित झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यामध्ये शिर्डीला दर्शनासाठी निघालेले ३ जण ठार झाले होते. शनिवारी (ता. १०) सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर पुन्हा अपघात झाला. यामध्येही तिघांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT