लातूर - जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात शुक्रवारी पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील काही दिवसांपासून निलंगा (Nilanga) तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागात भुकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. प्रशासनाने मात्र भुकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले होते. शुक्रवारी पहाटे 3.38 मिनिटांनी 2 रिश्टर स्केलचा भुकंप झाला असून त्याची नोंद भुकंप मापक वेधशाळेने घेतली आहे.
लातूर येथील भूकंप वेधशाळेपासून 52 किलोमीटर अंतरावर हासोरी परिसरात यांचा केंद्रबिंदू होता. यावेळी राष्ट्रीय भुकंप केंद्र पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे शास्त्रज्ञ राजीव कुमार, अजयकुमार शर्मा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भुगर्भशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रा.डॉ.अविनाश कदम, प्रा. डॉ. अर्जन भोसले हे उपस्थित होते.
दरम्यान, याआधी ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी हासोरी गावात भूगर्भातून आवाज आले. त्यानंतर ग्रामस्थ घरांमधून बाहेर पडले. अनेकांनी पशुधन सुरक्षितस्थळी हलविले होते. त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजताही आणखी एक सौम्य धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर १२ सप्टेंबरला रात्री १० वाजून ७ मिनिटांनी अनेकांना आवाज आणि हादरा जाणवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.