three fishermen drowned in pingali river near tivsa amravati.  saam tv
महाराष्ट्र

पिंगळाई नदीत घडलं अघटित; तहसीलदारांसह पाेलिसांची कुमक दाखल, मृतदेहांचा शोध सुरू

या घटनेची वार्ता परिसरात धडकताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातून वाहणाऱ्या पिंगळाई नदीमध्ये (river) मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तीन मच्छीमारांचा बुडून (drowned) मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची माहिती समजताच जिल्ह्याचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळी बघ्यांची देखील माेठी गर्दी झालेली आहे. (amravati latest marathi news)

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तीन मच्छीमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले हाेते. त्यांचा याच नदीत बुडून मृत्यू झाला. ही माहिती समोर आल्यानंतर काहींनी पाेलिसांना आणि प्रशासनाला कळविले.

घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार हे तीनही मच्छीमार तिवसा तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पाेहचले. तसेच जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. सध्या तीनही मच्छीमारांच्या मृतदेहाचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली. या घटनेची वार्ता परिसरात धडकताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT