Breaking Akola : अकोल्यात तीन दिवसांची संचारबंदी; प्रशासनाचा निर्णय जयेश गावंडे
महाराष्ट्र

Breaking Akola : अकोल्यात तीन दिवसांची संचारबंदी; प्रशासनाचा निर्णय

जिल्ह्यातील अकोट नंतर अकोला शहरात आजपासून संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढले आहेत. शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

जयेश गावंडे

अकोला : जिल्ह्यातील अकोट नंतर अकोला शहरात आजपासून संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी काढले आहेत. शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. सकाळी सहा ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी आणि सायंकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश काढले आहेत. अकोट शहरात सध्या शांतता असून शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

अमरावती शहरात त्रिपुरा घटनेसंदर्भात तणावपूर्ण परिस्थिती होऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी 17 नोव्हेंबर दुपारी बारा वाजतापासून ते 20 नोव्हेंबरचे सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण अकोला शहरासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत जमाबंदी व संचारबंदी बाबत आदेश लागू करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. जमावबंदीचा कालावधीत सार्वजनिक ठिकाणी चार किंवा चार पेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतिबंध आहे. विधान परिषद निवडणूक संदर्भात नामनिर्देशनपत्र दाखल करणे बाबत सूट राहील. संध्याकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी कालावधीमध्ये आरोग्यविषयक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालय आवश्यक कामासाठी सुरू राहतील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अकोला शहरामध्ये अमरावती पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, अकोट फाइल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव परिसरामध्ये किरकोळ वाद झाला होता. या घटनेनंतर मात्र मोठ्याप्रमाणात अफवा पसरल्या होत्या. परिणामी, खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाकडून संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले आहे.

गेल्या चार दिवसांपासून अकोट शहरांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्या ठिकाणी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच तिथे इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कालावधीमध्ये आणखीन दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अकोट शहरात सध्या शांतता आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नसल्याचे माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal News : महाराष्ट्रातील १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले, सर्वाधिक पर्यटक 'या' जिल्ह्यातील | VIDEO

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT