चंद्रपूरच्या महापौरांसाठी ११ लाखांची कार; नंबरसाठी हजारोंचा खर्च! संजय तुमराम
महाराष्ट्र

चंद्रपूरच्या महापौरांसाठी ११ लाखांची कार; नंबरसाठी हजारोंचा खर्च!

महापौरांसाठी अकरा लाखांची कार घेतानाच तिच्या क्रमांकासाठी 70 हजार रुपये उधळण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारातून महापालिकेची ही उधळपट्टी समोर आली आहे.

संजय तुमराम

संजय तुमराम

चंद्रपूर: चंद्रपूर Chandrapur महापालिका सध्या आर्थिक संकटात असतानाच नाहक उधळपट्टीचा प्रकार समोर आला आहे. महापौरांसाठी Mayor अकरा लाखांची कार घेतानाच तिच्या क्रमांकासाठी 70 हजार रुपये उधळण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारातून महापालिकेची ही उधळपट्टी समोर आली आहे.

चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्यासाठी ११ लाख रुपये खर्च करून ‘अल्फा नेक्सा कंपनीची एक्सएल ६’ Nexa ही कार फेब्रुवारी महिन्यात घेतली होती. यावेळी कोरोनाची दुसरी लाट भरात होती आणि लोकांना वैद्यकीय सेवेसाठी दारोदार भटकावं लागत होतं.

आरोग्य सेवा Health Service बळकट करण्यासाठी महापालिकेकडे Municipal Corporation पैसे नव्हते. पण अशाही स्थितीत महापौरांसाठी नवी कोरी कार घेतली गेली. महापालिकेचे "कार"नामे इथंच थांबत नाहीत, तर या वाहनाच्या अतिविशिष्ट (व्हीआयपी) क्रमांकासाठी "७०" हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे.

महामारीतही सामान्य जनतेच्या कराच्या Tax पैशाची सत्ताधारी भाजप BJP पदाधिकाऱ्यांकडून अशाप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याने येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महापालिकेत महापौर व आयुक्तांसाठी होंडा सिटी Honda City या कंपनीची कार आहे. अतिशय चांगल्या स्थितीतील महागडी कार असतानाही आयुक्त राजेश मोहिते Rajesh Mohite यांनी करोना महामारीच्या काळात महापौरांसाठी हे नवीन वाहन खरेदी केले.

त्यासाठी अतिविशिष्ट ‘एमएच ३४ बीव्ही ११११’ MH 34 BV 1111 हा क्रमांक मिळावा यासाठी राज्य परिवहन विभागाकडे ७० हजार रुपये शुल्क भरण्यात आले. सरकारनं कोरोना Corona उपचारावर निधी खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही अशाप्रकारे निधीचा दुरुपयोग यात केला गेला. विशेष म्हणजे, शासकीय वाहनासाठी अतिविशिष्ट क्रमांक मिळावा म्हणून अशाप्रकारे शासकीय निधी Government funding खर्च करणे अयोग्य आहे. तेव्हा आयुक्तांवर उधळपट्टीचा ठपका ठेवून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या या कारनाम्याची तक्रार बेले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. शासनस्तरावर याची काय दखल घेतली जाते, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

Gold Rate Today : पुन्हा सोन्याचे दर घसरले, अचानक इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा ढोबळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Gas Cleaning : 10 मिनिटांत गॅसवरील तेलकट डाग घालवा, वाचा हे सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT