नागपुर: एकीकडे दुर्गम आणि ग्रामीण भागातील भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहचत नसल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे बालभारती मात्र हजारो टन पुस्तकं रद्दीत विकत आहे. 2012 पासून बालभरतीनं वापरात नसलेली आणि जुन्या अभ्यासक्रमाची साडेपाच हजारांहून अधिक टन असलेली पुस्तके रद्दीत विकल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलं आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बालभारतीला या यासंदर्भातील माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यात हे धक्कादायक वास्तव पुढं आलं आल आहे. (Thousands of students' books in scrap heap ; Shocking reality revealed in the right to information)
हे देखील पहा -
अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळत नसल्याची ओरड दरवर्षी असते. पुस्तकं न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचलेली हजारो मेट्रिक टन पुस्तकं रद्दीत विकली जात असल्याची माहिती या माहिती अधिकारातून पुढं आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी 2012 पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तकं रद्दीत काढली आणि त्यापासून किती महसूल मिळाला, असे प्रश्न विचारले होते. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2012 ते मार्च 2019 या दरम्यान चार वेळा पुस्तकं रद्दीत काढण्यात आली. रद्दीत काढलेल्या पुस्तकाचे वजन 5 हजार 633 मेट्रिक टन एवढे होते. त्यापासून 6 कोटी 40 लाख एवढा महसूल मिळाला. यातून बालभारतीचे काम किती नियोजन शून्य आहे याची प्रचिती येते.
यासंदर्भात 'मेस्टा' संघटनेने विद्यार्थ्यांच्या पुस्तकात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. जाणीवपूर्वक पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जात नाही, रद्दी मधून पैसे खाता यावे, यात अधिकारी आणि मंत्री सहभाही असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी 'मेस्टा'चे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केली आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळ पुस्तकांची छपाई करते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहचत नाही. त्यामुळं ही पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी छापली जातात की रद्दीत विकून भ्रष्टाचार करण्याची अशी शंका निर्माण झाली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.