रसायनयुक्त पाण्यामुळे गोदावरी आणि वालदेवी नदी पात्रात हजारो मासे मृत अभिजीत सोनवणे
महाराष्ट्र

रसायनयुक्त पाण्यामुळे गोदावरी आणि वालदेवी नदी पात्रात हजारो मासे मृत

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी आणि वालदेवी नदीपात्रातील नांदूरमध्यमेश्वर नदीपात्रात हजारो मासे मृत झाले आहेत.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

गोदावरीच्या पुराच्या (godavari river flood water) पाण्यात रसायनयुक्त (chemical water) पाणी वाहून आल्यानं नांदूरमध्यमेश्वर (nandur madhyameshwar) गोदापात्रात हजारो मासे मृत झालेत, तर दुसरीकडे नाशिकरोड जवळ वालदेवी नदीपात्रात प्रदूषणयुक्त पाण्यामुळे हजारो मृत माशांचा खच पडल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. (Thousands of fish die) या दोन्ही नद्यांचं प्रदूषण नदीतील माशांच्या जीवावर उठलंय. (Thousands of fish die in Godavari and Valdevi river basins due to chemical water)

हे देखील पहा -

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी (godavari river) आणि वालदेवी (waldevi river) नदीपात्रातील नांदूरमध्यमेश्वर नदीपात्रात हजारो मासे मृत झालेत, तर दुसरीकडे नाशिकरोड जवळ वालदेवी नदीपात्रातही माशांची तीच अवस्था आहे. या दोन्ही नद्यांमध्ये प्रक्रिया न करता सोडण्यात येणारं गटारींचं आणि कारखान्यांमधील रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे या माशांची ही अवस्था झालीय. या नद्यांचं प्रदूषण नदीतील माशांच्या आणि अन्य जलचरांच्या जीवावर उठलंय. त्यामुळे पर्यावरणप्रेमी (Environmentalist) आणि स्थानिकांमध्ये (Locals) संतापाचं वातावरण आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पाण्यावर तरंगणारे हे मृत मासे काही नागरिक गोणीत भरून घेऊन गेल्याचं काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. रसायनयुक्त प्रदूषित पाण्यानं मृत्यू झालेले हे मासे चुकून खाण्यात आले, तर त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नांदूरमध्यमेश्वर पक्षीतीर्थ आणि परिसर हा रामसर दर्जा भेटलेलं ठिकाण आहे. या ठिकाणी हजारो देशी-विदेशी पक्षांचा अधिवास आहे. या पक्षाचं मुख्य खाद्य हे मासेच असल्यानं या पक्षांचा इथला अधिवासही धोक्यात सापडलाय.

नाशिकच्या गोदावरीनदीसह अन्य नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. थेट गटारींचं गोदापात्रात मिसळणारं पाणी, औद्योगिक क्षेत्रातले कारखाने (industrial Factories) आणि महापालिकेच्या एसटीपी प्लँटमधून प्रक्रिया न करता सोडण्यात येणारं प्रदूषित सांडपाणी यामुळे गोदावरीसह अन्य नद्यांचीही अक्षरशः गटारगंगा झाल्याची अवस्था आहे. त्यातच आता नद्यांचं हे प्रदूषण थेट नदीतल्या जलचर प्राण्यांच्या जीवावरचं उठल्यानं ही चिंतेची बाब बनलीय. त्यामुळे या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी गांभीर्यानं पावलं उचलण्याची गरज निर्माण झालीय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT