Nashik Police Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Police News : सोशल मीडियावरील एक चूक अन् थेट तुरुंगात जाल, नाशिक पोलिसांची नागरिकांना महत्त्वाची सूचना

Social Media Post : गुन्हेगारांच्या पोस्ट लाईक शेअर करणाऱ्यांना आता तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा गुन्हेगारांवर पोलिसांची बारीक नजर असते. मात्र या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समर्थन देणाऱ्यांची देखील आता खैर नाही. कारण गुन्हेगारांच्या पोस्ट लाईक आणि शेअर करणाऱ्यांवरही आता नाशिक पोलिसांची कारवाई होणार आहे.

गुन्हेगारांच्या पोस्ट लाईक शेअर करणाऱ्यांना आता तुरुंगवास भोगावा लागू शकतो. गुन्हेगारी आणि भाईगिरीचे रील्स लाईक आणि शेअर करणाऱ्यांना पोलिसांनी इशारा दिला आहे.

गुन्हा करतांना सोशल मीडियावर गुन्ह्याच्या पोस्ट टाकणाऱ्या गुन्हेगारांच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. गुन्हेगारांच्या सोशल मीडियावरील पोस्ट देखील गुन्हेगारीला प्रोत्साहन ठरत आहेत. (Crime News)

मागील आठवड्यात शहरातील सिडको परिसरात तरुणाचा खून करणाऱ्या मारेकऱ्याने खून केल्यानंतर पोस्ट केली होती. खून करून बदला घेतला, अशा आशयाची ही पोस्ट पोस्ट होती. (Latest Marathi News)

कथित भाईंकडून वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्ह्यांच्या पोस्ट आणि रिल्स पोस्ट केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. अशा पोस्टवर आता पोलिसांच्या सायबर सेलचं बारकाईने लक्ष असणार आहे. गुन्ह्यांच्या तसेच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट लाईक आणि शेअर करणाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT