GBS freepik
महाराष्ट्र

GBS: नागपूरात जीबीएसचा तिसरा बळी, ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा १२ वर

Nagpur GBS Virus: नागपुरात दुर्मीळ गिलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजारामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Dhanshri Shintre

नागपुरात ‘गिलियन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरात ‘जीबीएस’मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे.

मृत रुग्ण हा मध्यप्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृती अचानक खालावल्याने त्याला काही दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. नागपुरात आतापर्यंत ‘जीबीएस’चे एकूण २१ रुग्ण आढळले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

मेडिकलमध्ये सध्या एक साडेसात वर्षांचा बालक आणि एक वयस्कर रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जीबीएस हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल विकार असून, यात रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्नायूंवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू अशक्त होतात आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होतो.

अद्याप या आजाराचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी तो विषाणूजन्य संसर्गानंतर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य विभागाने नागपूर आणि परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले असून, नागरिकांनी कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

SCROLL FOR NEXT