Kolhapur Municipal Elections saam tv
महाराष्ट्र

कार्यकर्ता पॅटर्न! महायुती, महाआघाडीनंतर तिसऱ्या आघाडीची उडी; कोल्हापुरात राजकारण फिरलं

Kolhapur Municipal Elections : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं असून, राज्यात आघाडी-युतीच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. त्याचवेळी कोल्हापूरमध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत. महायुती, महाविकास आघाडीत थेट लढत होणार असतानाच, तिसऱ्या आघाडीनं यात उडी घेतली आहे.

Nandkumar Joshi

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर | साम टीव्ही

महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्य पातळीवरील, तसेच स्थानिक पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी जागावाटप आणि उमेदवारी वाटपावरच घोडं अडलं आहे. त्याचवेळी कोल्हापुरातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असल्याचं चित्र सुरुवातीला दिसत होतं, पण यात आता तिसऱ्या आघाडीनं उडी घेतली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यात आता तिसऱ्या आघाडीनं उडी घेतल्यानं निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. कार्यकर्ता पॅटर्न राबवत वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्ष एकत्र आले असून, त्यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घराणेशाहीला थारा न देता कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी ८१ जागांवर उमेदवार देणार असल्याची घोषणा या तिसऱ्या आघाडीकडून करण्यात आली. १६ जानेवारीनंतर महाविकास आघाडीने नेमकं काय गमावलं, हे त्यांना कळेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत आल्यास त्यांचं आम्ही स्वागत करू, असंही तिसऱ्या आघाडीच्या संदीप देसाई आणि अरुण सोनवणे यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस उमेदवारांची यादी होणार जाहीर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तीसहून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होणार आहे. आज रात्रीपर्यंत काँग्रेसकडून तीसहून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला दिलेल्या १२ जागा वगळून काँग्रेस पहिल्या टप्प्यातील तीसहून अधिक उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी (शरद पवार गट) वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांनो सावधान! अमूल-गोकुळच्या नावाखाली दुधात भेसळ, ७४ लिटर साठा जप्त

मनोज जरांगे मुंबईत धडकणार? मुख्यमंत्री निवासस्थानी आंदोलन करणार?

Maharashtra News Live Update: Dhule: गावच्या रस्त्यावर रिपोर्टिंग करणाऱ्या त्या शाळकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

Shravan Fasting : श्रावणात उपवासाला खा ८ चविष्ट पदार्थ, दिवसभर एनर्जी टिकून राहील!

SCROLL FOR NEXT