Latur DCC Bank दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur: प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्रीला चोरांचा DCC बँकेच्या तिजोरीलाच सलाम!

गॅस कटरच्या साह्याने तिजोरी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर : आज देशभर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात व्यस्त असताना लातुर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (DCC Bank) डल्ला मारला आहे. 26 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने तिजोरी फोडली. (Latur DCC Bank Robbery News Today)

गॅस कटर हे आकाराने मोठ्या आकाराचे असल्याने आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदाजे 12 लाखाच्या जवळपास रक्कम लांबवली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) झेंडावंदन करण्यासाठी बँक व्यवस्थापक आणि कर्मचारी बँकेत पोहोचले असता चक्क तिजोरी फोडल्याचे दिसून आले आहे. (Latur News In Marathi)

हे देखील पहा-

तात्काळ किल्लारी पोलिसांना याची माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. सदरील चोरांचा शोध घेण्यासाठी फिंगर प्रिंट तज्ञ पथक आणि श्वानपथक मागवून चोरांचा माग काढणार असून नेमकी रक्कम किती चोरीला गेली हे तपासणी झाल्यानंतर कळणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

Chia seeds: या व्यक्तींनी चुकूनही चिया सिड्सचं सेवन करू नये!

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

SCROLL FOR NEXT