Robbery at pune-solapur highway saam tv
महाराष्ट्र

पुणे-सोलापूर हायवेवर थरारक घटना! गोळीबार करुन भररस्त्यात कार अडवली, ३ कोटी ६० लाख लुटले

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थरारक घटनेनं खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बारामती : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर (indapur) तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटी येथे थरारक घटनेनं खळबळ उडाली आहे. भररस्त्यात गोळीबार करुन चोरट्यांनी (Robbery at pune solapur highway) एका कारला अडवून तब्बल ३ कोटी ६० लाखांची रोकड लंपास केली. ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली. या गंभीर घटनेमुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी गुजरात (Gujrat) येथील मेहेसना जिल्ह्यातील कहोडात राहणारे भावेशकुमार अमृत पटेल यांनी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरकुटे पाटी गावातील हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करत भररस्त्यात कार अडवली. त्यानंतर चोरट्यांनी कारमधील प्रवाशांना मारहाण केली. त्याच दरम्यान कारमध्ये लपून बसलेल्या दोन चोरट्यांनी कारमध्ये असलेली ३ कोटी ६० लाख रुपयांची रोख रक्कम, तीन मोबाईल फोन लंपास केले. याप्रकरणी इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KBC 17: अखेर त्याला उपरती झालीच,'बिग बीं'सोबतच्या वर्तनावर माफी मागितली,नेमकं काय म्हणाला....?

IND vs AUS : मायदेशात ऑस्ट्रेलिया २३६ धावांवर ढेपाळला, हर्षित राणाचा ४ विकेट चौकार

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते प्रचंड नाराज, पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार

Janhvi Kapoor Boyfriend: जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड कोण आहे? ज्याच्याशी लग्नाची सुरू झालीये चर्चा

Central Government: मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, ती एक मागणी मान्य, UPS, NPS मध्ये केले बदल

SCROLL FOR NEXT