सावधान! रेल्वे ट्रेनमधून प्रवास करताय, प्रवाशांच्या हॅंडबॅग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

रल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांच्या हॅंडबॅगमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केले.
Gold Robbery in railway train
Gold Robbery in railway trainsaam tv
Published On

अकोला : रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांकडे असणाऱ्या हॅंडबॅगमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने (Handbag Robbery) लंपास केल्याच्या घटना घडल्या. मुंबई-नागपूर येथे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर चोरट्यांनी एक महिलेला लुटले. महिलेची हॅंडबॅग चोरून त्यात असलेले (Gold robbery) १४ तोळे सोने, मोबाईल, ६ हजार रोख रक्कम, कागदपत्रे असा एकूण दहा लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

Gold Robbery in railway train
पिंपरी-चिंचवड हादरलं! लग्नाचं आमिष दाखवून सेल्स मॅनेजरने महिला डॉक्टरवर केला बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेने चोरीच्या घटनेची पोलिसांत नोंद केल्यानंतर एका संशयास्पद आरोपीला पोलिसांना (Police) ताब्यात घेतलं आहे. रईस शेख असं या आरोपीचं नाव आहे. त्यानंतर या आरोपीने चोरी केल्याचं कबुल केलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत शेखचा साथीदार शाहरूख निसार खान याला गुजरात मधून ताब्यात घेतलं.

Gold Robbery in railway train
Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड हादरलं! अनैतिक संबंधातून महिलेची हत्या

त्यानंतर पोलिसांनी मलकापूर रेल्वे स्टेशन जवळ आरोपी फिरोज अहमद फारूख अहमद शेख आणि मोहम्मद समशेर शाह सलीमला अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ७,८१,३२८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,४ मोबाईल,रोख रक्कम हस्तगत केली.

Edited By - Naresh shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com