Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड हादरलं! अनैतिक संबंधातून महिलेची हत्या

संगीता बाळासाहेब भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.
Pimpri-Chinchwad Crime
Pimpri-Chinchwad CrimeSaam TV
Published On

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. विवाहित पुरुषाला लग्न करण्यासाठी अविवाहित महिलेने तगादा लावल्याने, विवाहित पुरुषाने सुपारी देऊन संबंधीत महिलेची हत्या केली. संगीता बाळासाहेब भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) ४ आरोपींना अटक केली आहे. (Pimpri-Chinchwad Crime News)

Pimpri-Chinchwad Crime
Cobra Snake vs Mongoose : मुंगूस आणि कोब्रामध्ये घमासान युद्ध; कोण जिंकलं? पाहा VIDEO

पांडुरंग हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर आणि बजरंग तापडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, संगीता भोसले आणि व्यापारी बजरंग मुरलीधर तापडे यांचे मागील दोन वर्षापासून अनैतिक प्रेम संबंध होते, त्यामुळे संगीता भोसले ही सारखं बजरंग मुरलीधर तापडे या व्यापाराकडे लग्न करण्यासाठी तगादा लावत होती.

याचाच राग मनात धरून बजरंग तापड यांनी त्याच्या जवळचा मित्र पांडुरंग हारके यांना सांगून संगीता भोसले हिचा खून करण्याची सुपारी दिली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन परिसरात ९ ऑगस्ट रोजी संगीता हिची दोन आरोपींनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. (Pimpri-Chinchwad Todays News)

Pimpri-Chinchwad Crime
Viral Video : 'छम्मा छम्मा' गाण्यावर एअर हॉस्टेसचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ

पांडुरंग हाके यांनी सुपारी घेऊन त्याचे दोन जवळचे मित्र सचिन प्रभाकर थिगळे आणि सदांनद रामदास तुपकर यांना संगीता हिला मारण्याची सुपारी दिली. त्यानुसार सचिन थिगळे आणि सदानंद तुपकर यांनी संगीता भोसले हिची स्कुटी गाडी अडवून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.

या थरारक घटनेनंतर पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा पथकाने अतिशय कौशल्याने तपास करून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. प्रकरणात सहभागी असलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com