रेकॉर्डवरील चोर पोलिसांच्या जाळ्यात; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त... विजय पाटील
महाराष्ट्र

रेकॉर्डवरील चोर पोलिसांच्या जाळ्यात; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त...

सांगलीमध्ये रेकॉर्डवरील चोरीतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या करणारा रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी पकडले आहे. सिताराम लक्ष्मण येडगे असे त्याचे नाव आहे असून तो सोलापुरचा आहे. त्याच्या ताब्यातील १० लाख १२ हजार रुपये किंमतीचे चोरीचे साहित्य जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. (Thieves on record caught by police; Ten lakh worth of property confiscated)

हे देखील पहा -

खानापूर तालुक्यातील करंजे खानापूर येथील शिवेच्या मळ्यातून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर ४ ऑगस्ट २०२१ रोजी चोरी झाल्याची फिर्याद मारूती विठोबा माने यांनी विटा पोलिसात दिली होती. त्याचा तपास करत असताना खबऱ्याद्वारे माहिती मिळाली असता आरोपी येडगे याला विटा येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगली व सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या केल्याची त्याने कबुली दिली आहे.

त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केलेला ३ लाख ३४ हजाराचा एक ट्रॅक्टर, ४ लाख ५८ हजार रूपयांचे सहा रोटर, ५५ हजारांचे एक औषध फवारणी करण्याचे यंत्र, ९९ हजारांचे स्टाईल फरशीचे ९९ बॉक्स, ५० हजार रुपये किंमतीचे एक टन लोखंडी अॅंगल, ४ हजार ५०० रुपयांची आठ सिमेंट पत्र्याची पाने व १२ हजाराचे आठ रंगाचे डबे असा १० लाख १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर कवठेमहांकाळ, आटपाडी, सांगोला, विटा पोलिसात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे डोके यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT