बीडमध्ये धारदार शस्त्रे घेऊन चोरट्यांच्या धुमाकूळ; घटना CCTVमध्ये कैद!
बीडमध्ये धारदार शस्त्रे घेऊन चोरट्यांच्या धुमाकूळ; घटना CCTVमध्ये कैद! SaamTvNews
महाराष्ट्र

बीडमध्ये धारदार शस्त्रे घेऊन चोरट्यांच्या धुमाकूळ; घटना CCTVमध्ये कैद!

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये संचारबंदीत चोरट्यांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन घरफोडी करणारी टोळी सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. वारंवार चोरीच्या घटना घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून पोलीस प्रशासन अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे देखील पहा :

बीड (Beed) शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीड शहरातील शिवाजी धांडे नगरमध्ये एका आरोग्य कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी (Thieves) नगदी रकमेसह सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कृषी कार्यालयाच्या परिसरातही चोरट्यांनी चोरीचा (Theft) प्रयत्न केला होता.

परिसरातील विनोद घुले यांच्या घराचे दार तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी रकमेसह सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेलाय. घुले यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्रीच पोलीसांना (Police) फोन केला होता. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पाहणी केलीय. दरम्यान, दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटनेने नागरिकांत भितीचे (Fear) वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

SCROLL FOR NEXT