Supriya Sule saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule To Become President Of NCP: अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाला का दिली जातेय पसंती?, ही आहेत यामागची कारणं

Latest News: शरद पवारांच्या (Sharad Pawar) घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Priya More

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हे सर्वजण करत आहेत. पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील आणि प्रुफल्ल पटेल ही चार नावं आघाडीवर आहेत. पण आता राष्ट्रवादीचे हे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत साम टीव्हीला खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील सुप्रिया सुळेंच्या नावाला पसंती देखील दिली आहे.

सुप्रिया सुळेंना पसंती मिळण्यामागे ही आहेत कारणं -

- दिल्लीतील राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

- पक्षातल्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे यांची ओळख आहे

- देशातील सर्व मंत्री आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांशी त्यांचा सलोखा आहे.

- सुप्रिया सुळेंच्या वागण्या बोलण्यात आदरपूर्वक नम्रपणा आहे.

- संसदेत परखड आणि अभ्यासू भाषणं करण्याची त्यांची क्षमता आहे.

- हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचे उत्तम प्रभूत्व आहे.

- शरद पवारांच्या तालमीमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केलं आहे.

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करण्याच्या काही दिवसांपासूनच सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याच्या कागदोपत्री हालचाली सुरु झाल्या होत्या. अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर या हालचाली सुरु झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्या कागदपत्रांची तयारी 15 दिवसांपासूनच सुरु झाली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

अशामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला काहीच अडचण नाही, असे भुजबळांनी सांगितले. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे याच्या नावावरच शिक्कामोर्तब होऊ शकतो याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT