प्रेमात वय नसत! 66 वर्षांची वधु आणि 79 वर्षांचा वराचा आता एकत्र थाटणार संसार...  विजय पाटील
महाराष्ट्र

प्रेमात वय नसत! 66 वर्षांची वधु आणि 79 वर्षांचा वराचा आता एकत्र थाटणार संसार...

सांगलीच्या मिरज येथील आस्था बेघर महिला केंद्रात एक आगळा वेगळा विवाह संपन्न

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या मिरज येथील आस्था बेघर महिला केंद्रात. एक आगळा वेगळा विवाह संपन्न झाला आहे. यापूर्वी अनाथ निराधार मुलींची विवाह झालेले आहेत. परंतु, बेघर केंद्रातील आश्रित असलेल्या 66 वर्षाच्या शालन यांचा 79 वर्षीय दादासाहेब साळुंखे यांच्याशी विवाह संपन्न झाला आहे. एका बेघर वृद्धाला आसरा देण्याचा आनंद सोहळा संपन्न झाला आहे. वयाचे बंधन झुगारून, पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शालिनी यांच्या पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर जीवनाची फरफट होत होती. महापालिका बेघर केंद्रात आधार शोधत 66 वर्षाच्या शालिनी आले होते. तर दुसरीकडे निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे वय वर्षे 79 यांच्या ही पत्नीचे निधन झाले होते. मुलांचे विवाह झाल्यानंतर मुले आपापल्या प्रपंचात मशगुल झाल्याने, दादासाहेब याच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होता.

हे देखील पहा-

वाढतं वय आणि वेळेवर पोटाला खायला मिळत नाही. पुढील आयुष्यात पर्याय शोधण्यासाठी पुनर्विवाहाची  सहमती घेतली. वधुच्या शोधात असताना जीवनाची सोबती बेघर केंद्रात सापडली. एकमेकांचे विचार सुख- दुःख वाटून घ्यायचा निर्णय घेतला आहे. आणि मुहूर्त ठरला. पाहुणे बेघर केंद्रातील समदुःखी महिला वधू शालिनी पाषाण पुणे येथील आहेत. तर निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे हे सांगलीच्या तासगाव येथील कवठेएकंद येथील आहेत.

यावेळी ज्येष्ठ वधू- वरांचे समुपदेशन करण्यात आले. समाज सुधारक सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार आणि वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकण्यात आले आहेत. परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण आणि कालबाह्य झालेल्या पद्धतीला फाटा देऊन, वयाचे बंधन झुगारून, पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Saturday Horoscope : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT