Medicines, nashik crime news Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : रात्रीस खेळ चाले... १ कोटी ४० लाखांचा चाेरीच्या तपासाचे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेपुढं आव्हान

Siddharth Latkar

- अजय साेनावणे

Nashik News : नाशिक मुंबई-आग्रा महामार्गावर (nashik mumbai agra highway) पिंपळगाव टोल नाका ते चांदवडच्या राहूड घाटाच्या दरम्यान ट्रक मधून अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीची तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची औषधं चोरल्याची घटना उघडीस आली आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. (Maharashtra News)

ट्रकचालक मोहमंद सलमान निसार अहमद सलमान (वय ३०, राहणार टोपरा, तहसील पूर्वा, जिल्हा उन्नाव, उत्तर प्रदेश) याने दिलेल्या तक्रारीनूसार चांदवड पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिकहून धुळ्याला मोहमंद सलमान निसार अहमद सलमान हा औषधं घेऊन निघाला हाेता. चालत्या ट्रकमधून चाेरी झाल्याचे त्याने तक्रारीत म्हटलं आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भिवंडी येथील सोनोफी नावाच्या औषध कंपनीमधून ३ ऑगस्टला वेगवेगळ्या औषधांचे ५२३ बॉक्समध्ये ५ कोटी ९७ लाख ६४ हजार ०२७ रुपये किमतीचे औषधे मुंबई येथील कुलेक्स कोल्ड चेन लिमिटेड कंपनीच्या टाटा १६१३ रेफर ट्रक (क्र. एम. एच. ०४, जे. यु. २३३९)मध्ये वाहनचालक मोहमंद सलमान निसार अहमद सलमान मुंबई-आग्रा महामार्गाने घेऊन चालला होता.

ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास पिंपळगाव बसवंत ते राहूड घाट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रकचा मागील दरवाजा उघडून सुमारे १ कोटी ३९ लाख ४४ हजार ७३३ रुपयांची औषधे चोरून नेली.

ट्रकचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने वाहन थांबवून बघितले असता औषधे चोरीला गेल्याचे समजले. या घटनेबाबत चांदवड पोलिसांना माहिती दिली असता चांदवडच्या अधिकारी सविता गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

या चोरीची रक्कम जास्त असल्याने चोरीचा गुन्हा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT