Nashik Latest News, Nashik crime news in Marathi
Nashik Latest News, Nashik crime news in Marathi Saam TV
महाराष्ट्र

नाशिकमध्ये लाखोंच्या गोडे तेलावर चोरट्यांचा डल्ला!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- तरबेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये आता चोरट्यांनी गोडे तेलाकडे मोर्चा वळवला आहे. नाशिकच्या (Nashik) पेठ रोड येथे चक्क चोरट्यांनी तेलाच्या डब्यांवर हात साफ केला असून, लाखोंचा गोडतेलाचा माल चोरून नेला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पेठ रोड इथल्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड गेट जवळ नाशिक मर्चंट बँकेच्या बाजूला जे एम ट्रेडर्स नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. (Nashik Edible Oil Theft)

हे देखील पाहा :

चोरट्यांनी रात्रीच्यावेळी हे गोदाम फोडून येथून तब्बल चार लाख, शहात्तर हजार, पाचशे ऐंशी रुपये किमतीचे जेमिनी, सनफ्लॉवर, फोरचुन, मुरली अश्या विविध कंपन्यांच्या गोड तेलाचे (Edible Oil) लिटर आणि किलोचे असे एकूण १२५ डब्बे चोरट्यांनी चोरून (Theft) नेले आहेत. तर अन्य देखील काही मालावर चोरट्यांनी हात साफ केला आहे.(Nashik crime news in Marathi)

या चोरट्यांना (Thieves) पकडण्याचे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून गोड तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा गोड्या तेलाकडे वळवला आहे. या संपूर्ण प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : राज्यात पाचव्या टप्प्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

Maharashtra Lok Sabha Voting Live: निकालाआधीच सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाच्या कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये फोडले फटाके

Lok Sabha Election Voting | बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बजावला मतादानाचा हक्क!

SCROLL FOR NEXT