योगी सरकार लखनऊमध्ये बांधणार भव्य 'लक्ष्मण मंदिर'

हे लक्ष्मण मंदिर पुढील पाच वर्षात बांधले जाईल.
योगी सरकार लखनऊमध्ये बांधणार भव्य 'लक्ष्मण मंदिर'
योगी सरकार लखनऊमध्ये बांधणार भव्य 'लक्ष्मण मंदिर'SaamTVnews

लखनऊ: अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारणीचे काम जोरात सुरू असतानाच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) भव्य लक्ष्मण मंदिर (Laxman temple) बांधण्यात येणार आहे. यासोबतच, उत्तर प्रदेश सरकार बलरामपूर जिल्ह्यातील पहिले आदिवासी संग्रहालय 'थारू आदिवासी संग्रहालय' लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले करण्याच्या तयारीत आहे. योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath) लखनऊमध्ये भव्य लक्ष्मण मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील पाहा :

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, श्री लक्ष्मण पीठ सेवा न्यासचे अध्यक्ष पंडित धीरेंद्र वशिष्ठ यांनी सांगितले की, मंदिरासाठी एक एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. लक्ष्मण मंदिराची (Temple) उंची ८१ फूट असेल. ते पुढे म्हणाले की हे लक्ष्मण मंदिर पुढील पाच वर्षात बांधले जाईल. वशिष्ठ म्हणाले, "मंदिराच्या बांधकामाला सुमारे पाच वर्षे लागतील आणि मीनाक्षी तिवारी आणि सुनील श्रीवास्तव यांनी वास्तु नियमांनुसार त्याची रचना केली आहे. हे मंदिर अतिशय उत्कृष्ट शैलीचे आणि डिझाइनमध्ये भव्य असेल."

योगी सरकार लखनऊमध्ये बांधणार भव्य 'लक्ष्मण मंदिर'
विमानात चढू न दिल्याने महिलेला आला पॅनिक अटॅक, Viral Videoनंतर एअर इंडियाचे स्पष्टीकरण

तसेच, पहिले थारू आदिवासी संग्रहालय बलरामपूरच्या इमिलिया कोडर गावात आहे. 5.5 एकर जागेवर हे संग्रहालय बांधले आहे. ते जवळपास पूर्णत्वाच्या जवळ आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लखनऊ, सोनभद्र आणि लखीमपूर खेरीमध्ये अशीच आदिवासी संग्रहालये बांधण्याची योजना आखली आहे. यूपी सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सरकारी मुला/मुलींच्या शाळांमध्ये शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळे आणि अभिमानाचे फलक लावण्याची योजना आखली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com