भंडाऱ्यात सराफा दुकानांसह ५ ठिकाणी चोरी! अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

भंडाऱ्यात सराफा दुकानांसह ५ ठिकाणी चोरी !

भंडाऱ्यातील साकोली येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरी केली असून यामध्ये जवळपास ५० लाखांचा ऐवज चोरटयांनी लांबविला आहे. विशेष म्हणजे बंदुकीसह ६ काडतुसे देखील चोरट्यांनी लंपास केली आहेत.

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन सराफा दुकानांसह पाच ठिकाणी चोरी केल्याची घटना सकाळी उघडकीस आली असून चोरट्यांनी 50 लाखांच्या मुद्देमालासह सराफा दुकानातून सहा जीवंत काडतुसांसह बंदूक लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

साकोली शहरातील राष्ट्रीय महामार्गावर रुपेश खेडीकर यांचे खेडीकर ज्वेलर्स आणि राजेश शहाणे यांचे पुष्पम ज्वेलर्स आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही सराफा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. सदर घटनेची माहिती तात्काळ साकोली पोलिसांना देण्यात आली आहे.

प्राथमिक अंजादानुसार चोरट्यांनी 50 लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खेडीकर ज्वेलर्समधून सहा जीवंत काडतुसे व बंदूक चोरुन नेली आहे. तर या सोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या सुमन डेअरीतही चोरी झाली आहे. तेथून चोरट्यांनी 22 हजार रोख लंपास केले.शिवाय दोन टपऱ्याही चोरट्यांनी फोडल्या आहेत. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी चोरी झालेल्या दुकांनासमोर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. साकोली पोलिसांकड़ून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे चोरांनी बंदूक चोरल्याने त्याचा वापर घातपातासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे साकोली पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कारची दुचाकीला धडक, मोटारसायकल स्वारला लांबपर्यंत नेलं फरफटत, दिवेआगरमधील घटना

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

शिक्षकांची परीक्षा; इलेक्शन ड्युटी होणार रद्द

SCROLL FOR NEXT