Sangli Crime News , Grapes Trader, Nashik, SP Basavraj Teli saam tv
महाराष्ट्र

Sangli Crime News : भरदिवसा नाशकातील व्यापा-याचे एक कोटी दहा लाख लुटले; तासगावात खळबळ, एसपी तेली घटनास्थळी

यावेळी गाडीतील चालक आणि केवलानी यांच्यासह त्यांच्या सोबत असणाऱ्या कामगाराला मारहाण सुरू केली.

विजय पाटील

Sangli News : सांगली (sangli latest marathi news) जिल्ह्यातील तासगाव येथे एका द्राक्ष (grapes) व्यापाऱ्यास लुटण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी घडला आहे. सुमारे एक कोटी दहा लाख रुपये लुटल्याची तक्रार व्यापा-याने पाेलिसांत नाेंदवली आहे. या घटनेची घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक बसवराज तेली (Sangli SP Basavaraj Teli) हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले होते. (Maharashtra News)

तासगावच्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे. तासगाव पोलिसांनी तातडीने या घटनेची नोंद घेतली असून चाेरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. महेश केवलानी मूळ राहणार नाशिक सध्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनीत वास्तव्यास आहे.

महेश केवलानी हे द्राक्ष व्यापारी असून तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतक-यांकडून द्राक्ष घेऊन ते विक्री करतात. केवलानी यांनी खरेदी केलेल्या द्राक्षाचे पैसे देण्यासाठी मंगळवारी सांगलीतून आपल्या गाडीतून एक कोटी 10 लाख रुपयांची रक्कम एका बॅगेत भरून तासगावला येत होते.

ते राहत असलेल्या गणेश कॉलनी येथे पोहचले असता अचानक सहा ते सात जणांनी केवलानी यांची गाडी अडवली. यावेळी गाडीतील चालक आणि केवलानी यांच्यासह त्यांच्या सोबत असणाऱ्या कामगाराला मारहाण सुरू केली. यामध्ये ते खाली पडल्याने त्यांना डोक्याला मार लागला. या दरम्यान हल्लेखोरांनी गाडीत असणारी एक कोटी दहा लाख रुपये रकमेची बॅग लंपास करत घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनास्थळी तासगाव पोलिसांनी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बसवराज तेली हे देखील घटनास्थळी दाखल झाले.

तेली यांनी व्यापारी महेश केवलानी यांच्याकडून घटनेची माहिती घेत लुटारूंच्या शोध घेण्यासाठी तीन ते चार पथके रवाना केली. त्याच बरोबर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. या घटनेमध्ये हल्लेखोरांनी महेश केवलानी यांच्यावर पाळत ठेवून त्यांचं पाठलाग करत त्यांना लुटले असून प्लॅनिंग करून हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT