सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील समडोळी येथे रहिवासी पर्यटनासाठी गेल्याची संधी साधून बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रकमेसह पंधरा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. (sangli latest crime news in marathi)
समडोळीतील नागरी वस्तीत असलेल्या एका मंदिरा नजीक राहत असलेले डॉक्टर प्रणय अशोक काेल्हापूरे हे सोमवारी सकाळी कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. त्यांचे घरमालक कामा निमित्त मंगळवारी त्यांच्या घराजवळ आले असताना त्यांना डॉक्टर काेल्हापूरे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याची माहिती डॉक्टर कोल्हापूरे यांच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी परिस्थितीची खातरजमा करुन सांगली ग्रामीण पोलीसात अज्ञाता विरोधात तक्रार दिली.
या घटनेत २५ तोळे सोने, एक किलो चांदी, ७० हजार रुपये असा १५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी पोलिसांनी तेजा नामक श्वानास पाचारण केले होते. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला तथापि एका ठिकाणी श्वान घुटमळत राहिले. सांगली ग्रामीण पोलीस (sangli police) ठाण्याचे अधिकारी व विशेष पथक या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.