Culprit Arrested Saam Tv
महाराष्ट्र

Crime: चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक; सोन्याच्या दागिनेसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - तालुक्यातील मौजे मुरुड येथील सोनाराच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागीराने सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्यास पोलिसांनी (Police) मुरुडच्या बसस्थानकामधून ताब्यात घेतले. चोरलेल्या दागिन्यासह 14 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुरुड येथील सोन्या चांदीचे व्यापारी 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील कारागिराला दुकानात बसवून जेवण करण्यासाठी घरी गेले होते.

हे देखील पाहा -

दरम्यानच्या वेळेत दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांच्याच दुकानातील कारागीर सुग्रीव उर्फ बाळुकुमार बावकर याने चोरी करून पळ काढला होता. व्यापारीच्या फिर्यादवरून मुरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पुणे येथून लातूरच्या दिशेने बस मधून पळून जात असताना मुरुड बस स्थानकात आरोपी सुग्रीव उर्फ बाळूकुमार बावकर हा मुरुड बस स्थानकात आलेल्या एका बस मधून उतरून तोंड लपवून एका ऑटो मध्ये बसताना दिसला. पथकाने त्याला चोरलेल्या दागिन्याच्या बॅगसह ताब्यात घेतले.

आरोपीला मुरुड पॉलसा ठाण्यात आणण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने चोरलेल्या 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यामधून पोलिसांनी 14 लाख 67 हजार 750 रुपयांचे 285 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT