बुलढाणा : मागील अनेक महिन्यापासून शांत बसलेले चंदनचोर (Sandalwood thief) आता पुन्हा डोके वर काढत आहे. मागील दोन रात्री या चोरट्यांनी बुलडाणा शहरातील दोन अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून 6 चंदनाची झाडे चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यातून 4 तर तहसीलदार यांच्या बंगल्यातून 2 चंदनाची झाडे कापुन नेत चोरी केली आहे. (The thieves stole sandalwood trees from the official residences of the Upper Collector and Tehsildar)
अजिंठा पर्वत रांगेवर असल्याने बुलडाणा शहर नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण आहे. येथे वास्तव्यास असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यात हमखास चंदनाची मौल्यवान झाडे आहेत. खुल्या बाजारात चंदनाची किंमत जास्त असल्याने अनेक चोरट्यांची नजर या झाडावर असते. मागील इतिहास पाहिला तर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून सुद्धा चंदनाची झाडे चोरी गेलेली आहे. ताज्या घडलेल्या घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा तहसिलदार रुपेश खंडारे यांच्या "काटेपूर्णा" नावाच्या शासकीय निवासस्थानातून 1 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी 2 चंदनाची झाडे कापून नेल्याची घटना घडली.
तर दुसरी घटना बुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या निवासस्थानाची आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी "संतचोखामेळा" या बंगल्यातून 4 चंदनाची झाडे चोरून नेली. अशाप्रकारे 2 रात्री अज्ञात चंदन चोरट्यांनी 6 चंदनाची झाडे चोरली आहे. या घटनेबाबत बुलडाणा शहर पोलीसाला कळविण्यात आले असून अद्याप तरी गुन्हा दाखल नसल्याचे समजते. या चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.