Nashik News  Saam TV
महाराष्ट्र

शिक्षण खात्याची अब्रू वेशीवर; गुरुजींनी आपल्या जागी नेमले चक्क 2 भाडोत्री शिक्षक

मालेगाव महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 47 मध्ये हे दोन भाडोत्री शिक्षक ज्ञानदान करत असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांना आढळून आलंय.

अभिजीत सोनावणे

नाशिक: मालेगाव महापालिकेच्या (Malegoan Muncipal Corporation) उर्दू शाळेत चक्क भाडोत्री शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या शाळेत कायमस्वरूपी नोकरीवर असणाऱ्या शिक्षकांनी चक्क आपल्या जागेवर भाडोत्री शिक्षकांची नियुक्ती केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची अब्रू पुरती वेशीवर टांगली गेलीय. मालेगाव महापालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 47 मध्ये हे दोन भाडोत्री शिक्षक ज्ञानदान करत असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांना आढळून आलंय. त्यातील एक महिला मुख्याध्यापकांच्या वर्गावर शिकवत होती. तर दुसरा एक शिक्षक दुसऱ्या वर्गावर ज्ञानदान करत होता.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा भांडाफोड झाला आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून याची पालकांना सुद्धा माहिती नव्हती. उर्दू शाळेत नोकरीवर कायम स्वरूपी काम करणाऱ्या दोन शिक्षकांनी आपल्या जागी दोन भाडोत्री शिक्षक ठेवले होते. त्यामुळे हे शिक्षक नोकरीवर नसायचे. त्यांच्या जागी हे भाडोत्री शिक्षक शिकवायचे. त्यांना महिन्याकाठी पंधराशे रुपये नोकरीवर कायम असणारे शिक्षक देत होते, असं समोर आलंय.

विशेष म्हणजे यातील एक शिक्षिका चक्क मुख्याध्यापकाच्या वर्गावर शिकवत असल्यानं जर मख्याध्यापक असं करत असतील, तर इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर आता याबाबतचा पंचनामा करून अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिका उपायुक्तांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT