घरगुती वादातून मुलानेच केला बापाचा खून Saam tv news
महाराष्ट्र

घरगुती वादातून मुलानेच केला बापाचा खून

यात पुंजाजी यांच्या मुलाविरुद्ध सदोष खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anuradha Dhawade

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुसद शहर (Pusad City) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरी खुर्द (Bori Khurd) येथील रहिवासी पुंजाजी हरसुजी दीपके (वय ४५ वर्ष रा. बोरी खुर्द) यांची त्याच्याच मुलाने १५ वर्षीय हत्या केली आहे. (The son killed his father in a domestic dispute)

मिळालेल्या माहितीनुसार, पुंजाजी दीपके यांची मुलगी माहेरी आली होती. मात्र पुंजाजी दारू पिऊन वारंवार तिला सासरी जाण्यास सांगत होते. वडिलांच्या दारू पिण्याने आणि बहिणीला वारंवार सासरी जाण्यास सांगितल्याच्या रागाच्या भरात त्यांच्या १५ वर्षीय मुलाने त्यांच्या डोक्यात लाकडी काठीने वार केले. यात पुंजाजी यांनी गंभीर दुखापत झाली.

त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले,पण उपचारादरम्यान पुंजाजी यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार सिताराम हरसुजी दिपके (वय ५० वर्ष) यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनला दिली. यात पुंजाजी यांच्या मुलाविरुद्ध सदोष खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT