"चूप बैठो, हम कोरोना टेस्ट कर रहे है" म्हणत दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला लूटले Saam Tv
महाराष्ट्र

"चूप बैठो, हम कोरोना टेस्ट कर रहे है" म्हणत दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला लूटले

बीडमध्ये अनोखी शक्कल लढवत दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आलाय.

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये अनोखी शक्कल लढवत दरोडेखोरांनी (Robbers) दरोडा (Robbery) टाकल्याचा प्रकार समोर आलाय. "चुप बैठो हम कोरोना टेस्ट कर रहे है" म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास (Old Couple) शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण करत दरोडेखोरांनी घरातील सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटली आहे. हा धक्कादायक प्रकार माजलगाव (Majalgaon) शहरातील शिक्षक कॉलनीत काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी वयोवृध्द दांपत्यास मारहाण देखील केली असून या घटनेने माजलगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (The robbers robbed the elderly couple, saying, "Shut up, we are testing the corona.")

हे देखील पहा -

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे व सावित्री लक्ष्मण शिंदे हे वृंद दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुलं, सुना आणि नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात. रात्री 11 च्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आला व घराच्या मेन गेटला आतून कुलूप लावून आपल्या पत्नीला घेऊन वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. दरम्यान खालच्या हॉलमध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपून गेले. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दांपत्याला झाला. दरम्यान 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला.

यावेळी शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच, शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. "चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट (Corona Test) कर रहे है" असे दरडावून म्हणत. घरातील सामानाची नासधूस करत कपाट धुंडाळले. यावेळी त्यांनी घरातील रोकडीसह कपाटातील सोन्याचांदीचे दागिने असा 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लुटला व घराला बाहेरून बंद करून घरातून पोबारा केला. दरम्यान या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 395, 357, 342 नुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT