Corona Update: सावधान! नाशकातील वाढती रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा Saam Tv
महाराष्ट्र

Corona Update: सावधान! नाशकातील वाढती रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा

रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध कडक करण्याचा इशारा नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी दिली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक - शहरातील वाढती कोरोनाबधित (Corona) रुग्णांची संख्या ही धोक्याची घंटा असून रुग्णसंख्या आणखी वाढत गेली, तर निर्बंध आणखी कडक करावे लागतील, अशी माहिती नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी दिली आहे. तर या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा (School) सुरू ठेवायच्या की बंद? याबाबतचा निर्णय कोरोना आढावा बैठकीत सर्वानुमते घेतला जाणार असल्याचंही आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले आहे. (Nashik Corona Latest Update)

हे देखील पहा -

मागील 10 दिवसात नाशिक (Nashik) शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पाचशेने वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या नाशिककरांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

तर शहरातली सभागृह, मंगल कार्यालय आणि लॉन्स पालिकेच्या रडारवर असून मर्यादेपेक्षा जास्त लोकांची गर्दी आढळल्यास तसंच नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा तसंच वेळप्रसंगी मंगल कार्यालय आणि लॉन्स सील करण्याचा इशाराही पालिका आयुक्तांकडून देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT