टीईटी घोटाळा प्रकरणातील प्राध्यापक आणि शिक्षक अजून ही फरार...  SaamTV
महाराष्ट्र

टीईटी घोटाळा प्रकरणातील प्राध्यापक आणि शिक्षक अजून ही फरार...

जालना शहरातील शकुंतला नगर येथील घराची झाडा झडती घेत कुटूंबियांची कसून चौकशी केली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : टीईटी घोटाळ्या प्रकरणी पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने जालन्यातील (Jalna) प्राध्यापक सुनील कायंदे यांच्या वाटुर फाटा (Vatur) येथील निवास्थानाची आणि सेवली (Sevli) येथील शिक्षक असलेल्या दिलीप जायभाय यांच्या जालना शहरातील शकुंतला नगर येथील घराची (house) झाडा झडती घेत कुटूंबियांची (Family) कसून चौकशी केली आहे.

या चौकशीत पुणे (Pune) स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमच्या हाती काही महत्वाची जात प्रमाणपत्र (Certificate) आणि काही कागदपत्रे ही, हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सुनील कायंदे आणि दिलीप जायभाय आजून ही फरार असून या प्रकरणामध्ये पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम कडून त्यांचा शोध सुरु आहे.

हे देखील पहा-

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जीए एजन्सीचा संचालक प्रिंतेश देशमुख यांचा मित्र संतोष हरकाळ आणि त्यांचा भाऊ अंकुश हरकाळ यांच्या वर्ग मित्र असलेल्या कायंदे आणि शिक्षक दिलीप जायभाय यांनी टीईटीच्या (TET) 2018-19 च्या परीक्षेत टीईटी प्रमाणपत्र परीक्षेत शंभराहून अधिक शिक्षकाकडून (teacher) पैसे घेऊन घोटाळा केल्याच्या संशयित ऑडिओ क्लिप (Audio clip) साम टीव्हीच्या हाती आले होते.

ऑडिओ क्लिप हाती आल्यानंतर पुणे पोलिसांनी (Police) जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 9 तास या दोघांच्या घराची झाडाझडती घेत कुटुंबातील सदस्यांची कसून चौकशी करत काही कागदपत्र ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. मात्र, पोलिस दाखल होण्यापूर्वीच हे दोघे ही फरार झाले आहे. पुणे पोलिसांकडून दोघांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या दोघांचा शोध लागल्यास या प्रकरणी आणखी काही मोठे मासे हाती लागण्याची शक्यता ही सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

SCROLL FOR NEXT