HSC Exam Saam TV
महाराष्ट्र

All The Best! आजपासून बारावीच्या ॲाफलाईन लेखी परीक्षेला सुरुवात

कोरोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यात आजपासून बारावीच्या (HSC Exam) परीक्षेला सुरुवात होत आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर विद्यार्थी पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधीच परीक्षा केंद्रावर येण्याची सूचना करण्यात आली आहे. तीन तासांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात येणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने सर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अजूनही खबरदारी घेतली जात असून या परीक्षेसाठी सर्वांनी मास्क लावून यावे, कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेसंबंधीचे माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, राज्यातून एकूण १४,८५,८२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. कोरोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. राज्यात २,९९६ मुख्य केंद्र आणि ६,६३९ उपकेंद्रे अशा एकूण ९,६३५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

शाखानिहाय परीक्षेला बसणारे विद्यार्थी -

विज्ञान - ६,३२,९९४

वाणिज्य - ३,६४,३६२

कला - ४,३७, ३३६

आयटीआय - ९३२

व्होकेशनल - ५०,२०२

एकूण - १४,८५,८२६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT