मायलेकीच्या नात्याला काळीमा! चारित्र्याच्या संशयांवरुन जन्मदात्या आईने सुपारी देऊन केली गर्भवती मुलीची हत्या संजय तुमराम
महाराष्ट्र

मायलेकीच्या नात्याला काळीमा! चारित्र्याच्या संशयांवरुन जन्मदात्या आईने सुपारी देऊन केली गर्भवती मुलीची हत्या

पतीपासून विभक्त राहणारी सैदा गर्भवती राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत आईला शंका आली होती.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : जन्मदात्या आईनेच सुपारी देऊन मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) उघडकीस आली आहे. विरूर पोलिसांनी या घटनेचा खुलासा केला आहे. १८ फेब्रुवारीला एका अज्ञात महिलेचा राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथे विहिरीत मृतदेह आढळला होता. या परिसरात अज्ञात असलेल्या या महिलेची ओळख पटविण्यासाठी विरूर पोलिसांनी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये (Telangana and Andhra Pradesh) तिचे फोटो पाठवले. त्यावरून मयत महिलेचे नाव सैदा बदावत वयवर्ष ३० असे असून ती तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.

पतीपासून विभक्त राहणारी सैदा गर्भवती (Pregnant) राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत आईला शंका आली होती. त्यामुळे गर्भपात करण्याच्या बहाण्याने तिच्या आईने मुलीला राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडे पाठवले. ३० हजारांसाठी मुंडीगेट येथील नातेवाईक सीन्नू आणि त्याची पत्नी शारदा यांनी विहिरीत ढकलून सैदाचा खून केला. मात्र पोलिसांनी (Police)आरोपींचे कॉल डिटेल्स आणि बयाणातील विसंगती यांच्या आधारे खुनाचा उलगडा केला आणि सैदाची आई लचमी, नातेवाईक सीन्नू आणि शारदा यांना अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT