Aurangabad News Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad : मुख्याध्यापकांच्या 'या' मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उतरलं मैदानात

राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - शाळेत शिजणाऱ्या खिचडीच्या इंधन,भाजीपाल्याचे पैसे तब्बल ७ महिन्यापासून थकल्यानं मुख्याधापकांना पदरमोडीचा भुर्दंड बसत आहे. आता किमान दिवाळीपूर्वी (Diwali) तरी मुख्याध्यापांनी खर्च केलेले पैसे सरकार कडून मिळावेत अशी मागणी होत आहे. (Aurangabad latest News)

जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेत मध्यान्ह भोजन योजने अंतर्गत शिजवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराच्या खिचडीसाठीचे इंधन,भाजीपाल्याचे पैसे तब्बल ७ महिन्यांपासून थकल्याने मुख्याधापकांना पदरमोडीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. दिवाळीपूर्वी थकित पैसे वितरित करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेकरिता शाळांना प्रशासनाकडून तांदूळ आणि इतर धान्याचा पुरवठा केला गेला. मात्र इंधन,भाजीपाला,खाद्यतेलाचे अनुदान तब्बल ७ महिन्यांपासून मिळालेले नाही.परिणामी मुख्याध्यापकांना आपल्या खिशातून पदरमोडीने हा खर्च करावा लागत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षातील मार्च,एप्रिल आणि मे तर या शैक्षणिक वर्षातील जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत असे ७ महिन्यांचे अनुदान शाळांना देण्यात आलेले नाही.राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.

यंदाचे नवे शालेय सत्र सुरू झाल्यापासूनचा या आहाराचा सर्व आर्थिक भार हा शाळांच्या मुख्याध्यापकांना सहन करावा लागून हा खर्च मुख्याध्यापकांना आपल्या खिशातून करावा लागतो आहे. हे अनुदान हे शाळा पातळीपर्यंत दिवाळीपूर्वी मिळावं अशी मागणी केली जातेय.\

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT