Shivsena/MIM Saam TV
महाराष्ट्र

मला खासदार करण्यात शिवसेनेच्या मंत्र्यांचा सिंहाचा वाटा; इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

MIM कडून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेनेला आलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, आता खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : एमआयएमकडून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेनेला (Shivsena) आलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, आता खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट जलील यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मला सत्तार यांची मोठी मदत मिळाली. त्यामुळे मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचं जलील म्हणाले. तर पक्ष वेगवेगळे असले तरी इम्तियाज जलील यांच्यासोबत असलेली माझी मैत्री घट्ट आहे, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर २५ ते ३० वर्षापासून असलेल्या वर्चस्व असलेल्या शिवसेनेला मागील लोकसभा निवडणुकीत MIM ने धक्का दिला होता. कारण सलग चार वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा जलील यांनी पराभव केला होता. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला होता, मात्र आता शिवसेनेच्याच राज्यमंत्र्यांचा हातच या पराभवामध्ये असल्याचं स्वत: जलील यांनी बोलून दाखवल्याने सेनेच्या अंर्तगत वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

SCROLL FOR NEXT